गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022

Mhalunge crime : भांडणाच्या रागातून त्याने प्रेयसीवर केले वार

एमपीसी न्यूज : प्रियसीसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून प्रियकराने घरात घुसून प्रियसीवर वार केले आहेत. ही घटना बुधवारी (दि. 21) रात्री म्हाळुंगे येथे घडली.(Mhalunge crime) पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.

गजानन अंगद चौधरी (वय 31, रा. म्हाळुंगे, ता. मुळशी) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी जखमी 21 वर्षीय तरुणीच्या वडिलांनी (वय 48) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri fraud : 6 लाखांच्या कर्जाच्या आमिषाने 23 हजारांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 21 वर्षीय मुलीचे आरोपीसोबत प्रेमसंबंध होते.  त्या दोघांचे भांडण झाले होते. बुधवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी यांची मुलगी घरात एकटीच होती.(Mhalunge crime) झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपीने तरुणीवर धारदार शस्त्राने तोंडावर, नाकावर, पाठीवर वार केले. त्यात तरुणी गंभीर जखमी झाली. वार केल्यानंतर आरोपी निघून गेला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

spot_img
Latest news
Related news