गुरूवार, डिसेंबर 8, 2022

Mhalunge theft : म्हाळुंगे मधील कंपनीतून 14 लाखांचे 107 पार्ट चोरीला

एमपीसी न्यूज : म्हाळुंगे परिसरातील बी एम डी इंजिनिअरिंग या कंपनीतून चोरट्यांनी 14 लाख चार हजार 500 रुपयांचे जॉब पार्ट चोरून नेले.(Mhalunge theft) ही घटना 20 सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.

गोकुळ ज्ञानेश्वर भिसे (वय 29, रा. आंबेठाण, ता. खेड) यांनी याप्रकरणी महाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maval News : हातभट्टी दारू तयार करण्याचा अड्डा आरटीआय कार्यकर्त्याने आणला उघडकीस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची महाळुंगे येथे कंपनी आहे. सोमवारी (दि. 19) रात्री पावणे नऊ ते मंगळवारी (दि. 20) सकाळी साडेआठ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी (Mhalunge theft) कंपनीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या उघड्या पत्र्याच्या शेड मधून 14 लाख चार हजार 500 रुपये किमतीचे 107 जॉब पार्ट चोरून नेले. महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

Latest news
Related news