MIDC Bhosari crime : जेसीबीच्या सहाय्याने दुकानाची तोडफोड केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – जेसीबीच्या साहाय्याने टायर्सच्या दुकानाची तोडफोड केल्याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 20) सायंकाळी साडेपाच ते साडेसात या कालावधीत एमआयडीसी भोसरी येथे घडली.

एस. बी. शिंदे, एस. बी. सपकाळे, गायकवाड (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सदानंद गोपालन पणीकर (वय 67, रा. कामगार नगर, पिंपरी) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी मधील एफ ब्लॉकमध्ये आरोपींनी एस के टायर्स हे दुकान फिर्यादी पणीकर यांना चालविण्यास दिले आहे. पणीकर यांच्या ताब्यात दुकान असताना आरोपींनी कामगारांच्या साहाय्याने जेसीबीने दुकान तोडून दुकानाचे आणि आतील साहित्याचे नुकसान केले.

पणीकर यांना दुकानात येण्यासाठी अडवणूक करून शिवीगाळ व दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.