MIDC Bhosri : कामगारानेच चोरली सुमारे 34 हजार रुपयांच्या कॉपर वायर

एमपीसी न्यूज : कंपनीत काम करणाऱ्या कामगारानेच कंपनीत असलेल्या दुसऱ्या कंपनीच्या मालकीची सुमारे 34 हजार रुपयांची तांब्याची व अल्युमिनियमची तार चोरून नेली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.30) सकाळी साडे सहा वाजता एमआयडीसी भोसरी (MIDC Bhosri) येथे उघडकीस आला.

यावरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तिर्थ राजसिताराम यादव (वय 49 रा.भोसरी) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी फिर्यादीवरून सुनिल जय भगवान चव्हाण (रा. पिंपरी) याला अटक केली आहे.

Nigdi News : पालिकेकडून सुविधा देण्यास टाळाटाळ, निगडी पुलाखालील खाऊगल्ली बंद; विक्रेते पुन्हा रस्त्यावर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कंपनीत म्हणजे साई एन्टरप्रायजेसमध्ये (MIDC Bhosri) आरोपी स्वच्छतेचे काम करत होता. त्याने कंपनीच्या शेडचे काम करणाऱ्या आर.बी.टेक्नोक्रस्ट कंपनीची असलेली 33 हजार 80 रुपयांची कॉपर व अल्यूमिनीयमची इलेक्ट्रीक वायर चोरली. हा प्रकार उघडकीस येताच पोलिसात तक्रार करण्यात आली. यावरून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.