Pimpri News : एमआयडीसीचा शहरातील ‘या’ भागातील गुरुवारचा पाणीपुरवठा बंद

एमपीसी न्यूज – राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल व दुरुस्तीचे काम येत्या गुरुवारी (दि.18) करण्यात येणार आहे. त्यामुळे एमआयडीसी पाणीपुरवठा करत असलेल्या भागातील गुरुवारचा पाणीपुरवठा सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत दिवसभर बंद राहणार आहे.

याबाबतची माहिती एमआयडीसीचे उपअभियंता कल्पेश लहिवाल यांनी दिली.  एमआयडीसीच्या रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल व दुरुस्तीचे काम गुरुवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत काम सुरु राहणार आहे.

त्यामुळे एमआयडीसीकडून होणा-या पिंपरी, चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सीएमई, आर अँड डी, दिघी, व्हीएसएनएल, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड, ओएफडीआर या भागात गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

शुक्रवारी (दि.19) पाण्याचा पुरवठा हा  कमी दाबाने व अपुरा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाण्याचा साठा करावा. पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन एमआयडीसीने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.