_MPC_DIR_MPU_III

MiG-29K trainer aircraft : भारतीय नौदलाचे मिग-29 के विमान अरबी समुद्रात कोसळले

एमपीसी न्यूज – भारतीय नौदलाचं प्रशिक्षक मिग-29 के विमान दुर्घटनाग्रस्त होऊन गुरुवारी अरबी समुद्रात कोसळल्याची घटना घडली आहे.

अरबी समुद्रावरुन उड्डाण करत असताना हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. दुर्घटनेची माहिती मिळताच सर्च ऑपरेशन करत या दुर्घटनेतून रेस्क्यू टीमने एका वैमानिकाला वाचवलं असून दुसऱ्या वैमानिकाचा शोध अद्याप सुरु आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी सध्या चौकशीचे आदेश दिले आहेत. भारतीय नौदलाकडून यासंबंधी “भारतीय नौदलाचे मिग-29 के प्रशिक्षक विमान 26 नोव्हेंबरला पाच वाजता दुर्घटनाग्रस्त झाले. एका वैमानिकाचा शोध लागला आहे, तर दुसऱ्या वैमानिकाचा हवाई तसेच समुद्रमार्गे शोध घेतला जात आहे. याप्रकरणी चौकशीचा आदेश देण्यात आला आहे,” अशी अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

मिग – 29 विमानं याआधीही अनेकदा दुर्घटनाग्रस्त झाली आहेत. 8 मे 2020 रोजी पंजाबमधील नवाशहर येथे नौदलाचं लढाऊ विमान मिग-29 तांत्रिक बिघाड झाल्याने दुर्घटनाग्रस्त झाले होते.

तर 23 फेब्रुवारी 2020 रोजी गोव्यात मिग-29 दुर्घटनाग्रस्त झालं होतं. वैमानिक या दुर्घटनेतून सुखरुपपणे बाहेर पडला होता.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1