Talegaon Dabhade : पुणे जिल्हा कला शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी मिलिंद शेलार यांची निवड‌

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ सलग्न, पुणे जिल्हा कला शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी तळेगाव दाभाडे येथील कला शिक्षक मिलिंद संपतराव शेलार यांची सर्वानुमते निवड‌ करण्यात आली.   

पुणे जिल्हा कला शिक्षक संघाची कार्यकारिणी सभा नुकतीच पुणे येथे पार पडली. या सभेत पुणे जिल्ह्याची नवीन कार्यकारणी राज्य उपाध्यक्ष किरण सरोदे हुसेन खान यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली. जिल्हा अध्यक्षपदी मिलिंद शेलार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर सचिवपदी संजय भोईटे यांची निवड करण्यात आली.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे उपाध्यक्ष — श्याम साठे, माया म्याकल ,वाहीद खान , नितीन गायकवाड, कार्याध्यक्ष –हेमंत नागवडे, खजिनदार –भागूजी शिखरे, सहसचिव –चंद्रकांत जोशी, सहखजिनदार– पांडुरंग नेवसे, महिला आघाडी प्रमुख– अस्मिता गुरव , जिल्हा संघटक गणेश होले, यांची निवड करण्यात आली.

या निवडीबद्दल मिलिंद शेलार म्हणाले की कला शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत.ए.एम. स्केल सारखे ते सोडविण्यासाठी संघटनेच्या वतीने आम्ही प्रयत्न करू, तसेच शासन दरबारी निवेदनाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मिलिंद शेलार हे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या देहूरोड येथील श्री शिवाजी विद्यालयात  कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तसेच  महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे सहसचिव म्हणून कार्यरत असून श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे ते सचिव आहेत. व  रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सीचे खजिनदार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.