Pune : कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभास अभिवादन करण्यास लाखोंच्या संख्येने भीम सैनिक उपस्थित

 

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे गतवर्षी झालेल्या दंगल प्रकरणामुळे प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला  आहे . यंदा लाखोंच्या संख्येने विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी भीम सैनिक आले आहेत. सकाळच्या सुमारास भारिपचे प्रकाश आंबेडकर, भाजप राज्यसभा खासदार अमर साबळे, जोगेंद्र कवाडे यांच्यासह विविध संघटनाच्या प्रतिनिधींनी अभिवादन केले.

कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभास अभिवादन करण्यास पहाटे पासून भीम सैनिकांनी हजेरी लावली आहे . तर स्थानिक ग्रामस्थांनी येणार्‍या भीम सैनिकाचे गुलाबाचे फूल आणि पाण्याची बाटली देऊन स्वागत केले. यानंतर सकाळी सातच्या सुमारास भारिपचे प्रकाश आंबेडकर यांनी विजय स्तंभास अभिवादन केले.

या प्रसंगी ते म्हणाले की, गतवर्षी पेक्षा यंदा विजय स्तंभाच्या ठिकाणी येणार्‍या नागरिकांची संख्या अधिक आहे. तसेच मागील वर्षी येथील घटना लक्षात घेता कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता पोलीस प्रशासनाने घ्यावी. मात्र अद्याप पर्यंत दंगल घडवणार्‍यावर सरकारकडून कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे समाजात तेढ निर्माण कशी होईल आणि दंगल कशा घडतील. हेच सरकार पाहत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

यावेळी जोगेंद्र कवाडे म्हणाले की, दरवर्षी कोरेगाव भीमा येथे आल्यावर एक ऊर्जा मिळते. मात्र मागील दोनशे वर्षामध्ये विजय स्तंभाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची घटना घडली नाही. मात्र गतवर्षी दंगल घडली . यामुळे खूप वाईट वाटले असून याचा फटका प्रत्येक व्यक्तीला बसला आहे. या घटनेमागे आर एसएस, भाजपचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला . तसेच भिडे आणि एकबोटे यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे,अशी मागणी त्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.