Pune News : पुण्यात भारत आणि आफ्रिकी देशांच्या सैन्यदलांचा लष्करी सरावाला सुरुवात

एमपीसी न्यूज : भारत आणि आफ्रिका खंडातील 23 राष्ट्रांच्या दुसऱ्या संयुक्त क्षेत्र प्रशिक्षण (फिल्ड ट्रेनिंग) सरावाला पुण्यातील येथील औंध मधील परदेशी प्रशिक्षण विभागात सुरुवात झाली.(Pune News) या प्रशिक्षण सरावात इथिओपिया, घाना, केनिया, लेसोथो, निजर, सेशेल्स, टांझानिया, युगांडा, झांबिया, बोत्सवाना, कॅमेरून, काँगो, इजिप्त, इस्वाटिनी/स्वाझीलंड, मलावी, नायजेरिया, रवांडा, सेनेगल, झिम्बाब्वे आणि मोरोक्को या राष्ट्रांच्या तुकड्या आणि  प्रतिनिधी  सहभागी होत आहेत. 

 

हा संयुक्त सराव, भारत आणि आफ्रिका यांच्यात 2008 मध्ये झालेल्या भारत-आफ्रिका शिखर परिषदेनंतर आफ्रिकेशी अधिकाधिक संपर्क कायम राखण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा भाग आहे. 2019 नंतर तो यावर्षी आयोजित करण्यात आला आहे. मानवतावादी दृष्टिकोनातून भुसुरूंग निकामी करणे आणि शांतता प्रस्थापित करणे ही या सरावाची संकल्पना आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता कायम राखण्याच्या कार्यात  कार्यक्षमता आणि सज्जता यांच्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने सहभागी राष्ट्रांमधील लष्करी सहकार्य  महत्वपूर्ण आहे.

 

India News – क्वीन्स युनिव्हर्सिटीने भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती केली जाहीर

 

शांतता आणि सुरक्षेत वाढ करण्यासाठी लक्ष केंद्रीत करणे, नवनवीन कल्पना आणि अभिनव दृष्टिकोन यांची देवाणघेवाण करणे, सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यातील व्यवस्थापनाविषयी आफ्रिकेच्या अनुभवांचे अवलोकन  करणे आणि या उपक्रमांमधून भारत-आफ्रिका यांच्यातील संबंध अधिक मजबूत करणे  हा या सरावाचा उद्देश आहे.हा सराव चार टप्प्यात विभागण्यात आला आहे.

 

याबरोबरच 28 ते 30 मार्च 2023 या कालावधीत लष्कर प्रमुखांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. या दरम्यान हे  लष्कर प्रमुख संयुक्त  सरावाची पाहणी करतील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.