Pune Crime News : खडकीत लष्करी अधिकारी महिलेचे पाच लाखांचे दागिने चोरले

एमपीसी न्यूज – लष्करी अधिकारी महिलेच्या घराचा कोयंडा उचकटून चोरट्याने बेडरुममधील पाच लाख ३२ हजारांचे दागिने लांबविल्याची (Pune Crime News)  घटना खडकीतील रेंजहिल्स भागात घडली.

 

रेंजहिल्स भागात राहणार्या मेजर डॉ.पद्नाल वर्गीस (वय ३५, रा.जुनी मंडाले लाइन, रेंजहिल्स, खडकी) यांनी याबाबत खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद  (Pune Crime News) दिली आहे. डॉ. वर्गीस खडकीतील वैद्यकीय रुग्णालयात नियुक्तीस आहेत.त्यांचे पती मुंबईतील खासगी कंपनीत अधिकारी आहेत. डॉ.वर्गीस यांना लहान मुलगी आहे. रात्रपाळी असल्याने त्यांनी लहान मुलीला शेजारी ठेवले होते.

 

 

 

डॉ. वर्गीस सायंकाळी साडेसात वाजता घर बंद करुन रुग्णालयात गेल्या. चोरट्यांनी बैठ्या घराचा कडी कोयंडा तोडला. बेडरुममधील कपाटातून पाच लाख ३२ हजारांचे दागिने चोरटे घेऊन गेले. सकाळी नऊ वाजता डॉ. वर्गीस घरी आल्या. तेव्हा दरवाज्याचा कोयंडा उचकटल्याचे दिसले. बेडरुममधील कपाटातून दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीसांकडे तक्रार दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.