Bhosari News : भोसरी बस स्थानकात 31 डिसेंबर दूध वाटून साजरा

एमपीसी न्यूज – भोसरी बस स्थानकात 31 डिसेंबर केक कापून आणि दूध वाटप करून साजरा करण्यात आला. 31 डिसेंबर निमित्त अनेकजण दारू पितात, मात्र भोसरी येथे पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांनी 31 डिसेंबर अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

यावेळी आमदार महेश लांडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, नगरसेवक सागर गवळी, भिमाताई फुगे, पीएमपीएमएलचे पिंपरी मुख्यालय क्रमांक दोन हेड क्वार्टरचे प्रमुख व समन्वयक अधिकारी संतोष माने, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गवळी, भोसरीचे भैरवनाथ दहिहंडी उत्सवाचे अध्यक्ष योगेश लांडगे, माऊली लॉन्स मंगल कार्यालयाचे मालक राहुल गवळी, पीएमपीएमएलचे वरिष्ठ लिपीक बाप्पू रायकर, प्रकाश मोकाशी आदी उपस्थित होते.

पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. केचना केरूरे, वाहतुक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी बीआरटी बस स्थानकात हा कार्यक्रम घेण्यात आला. केक कापून दूध वाटप करण्यात आले. सुमारे 400 कर्मचारी आणि प्रवाशांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.

कार्यक्रमाचे आयोजन भोसरी बीआरटीचे प्रमुख काळुराम लांडगे, विजय आसादे, रोहिदास गवारे यांनी केले. वाहक चालक संजय खराबी, रामदास भगत, अशोक बढे, आनंदा पुंडे, पांडुरंग गुट्टे, दीपक चायवाला यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.