Lonavala News : खंडाळा घाटात दुधाचा टँकर उलटला; एक जण ठार

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा बोगद्याजवळ मुंबईच्या दिशेने जाणारा दुधाचा टँकर पलटी झाला. या अपघातात एक जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार दुधाची वाहतूक करणारा टँकर क्र. (MH12HD7299) हा मुंबईच्या दिशेने जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने पलटी होऊन जवळपास पन्नास फूट फरफटत गेला. या अपघातात टँकरमधील एकाचा मृत्यू झाला असून नेमका टँकर मध्ये अडकलेला मृतदेह चालक किंवा क्लिनर चा आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

टँकर हा महामार्गावरील मिडल लाईनवर पलटी झाला असल्याने मुंबईकडे जाणारी एक लेन सध्या बंद झाली आहे. महामार्ग पोलीस घटनास्थळावर दाखल झाले असून एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सदर टँकर बाजुला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.