Hinjawadi : रंगरंगोटी करणाऱ्या कामगारांनी पळवले पाऊण लाखांचे दागिने

एमपीसी न्यूज – पेंटिंगचे काम करण्यासाठी आलेल्या दोन कामगारांनी घरातून 74 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 10) दुपारी तीन वाजता सिग्निचर हाईट, वाकड येथे घडली.

अरुण हरिभाऊ पारखे (वय 35, रा. पद्मावती, पुणे), राम यादव साठे (वय 45, रा. धनकवडी, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या चोरट्यांची नावे आहेत. याबाबत अविनाश निर्मलचंद बारीक (वय 31, रा. सिग्निचर हाईट, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरातील पेंटिंगचे काम करण्यासाठी आरोपी अरुण आणि राम आले होते. पेंटिंगचे काम करत असताना फिर्यादी यांची नजर चुकवून त्यांच्या घरातील लाकडी कपाटातून चोरट्यांनी 74 हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही चोरट्यांना अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.