Pimpri : जलवाहिनी फुटल्याने नेहरुनगरमध्ये लाखो लीटर पाण्याची नासाडी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात एकीकडे एकदिवसाआड पाणीकपात असताना दुसरीकडे जलवाहिनी फुटल्यने लाखो लिटरची पाण्याची नासाडी झाली आहे. आज (गुरुवारी) पिंपरी, नेहरुनरमधील जलवाहिनी फुटल्याने पाण्याची नासाडी झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.

शहरवासियांची तहान भागविणा-या पवना धरणात यावर्षी मोठ्या प्रमाणावर जलसाठा आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. हिवाळ्यातच दिवसाआड पाणी कपात केली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांध्ये नाराजीचे वातावरण आहे.

एकीकडे दिवसाआड पाणीपुरवठा सुरु असताना आज सकाळी नेहरूनगर येथील संतोषी माता चौकाजवळ जलवाहिनी फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.