Hinjawadi News : बाणेर येथील बांधकाम साईटवरून सव्वाआठ लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – बाणेर येथील एका बांधकाम साईटवरून अज्ञात चोरट्यांनी आठ लाख 28 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 10) रात्री साडेआठ ते बुधवारी (दि. 11) दुपारी पाच वाजताच्या कालावधीत घडली.

अंकुश करंशीभाई अमिपरा (वय 31, रा. नवीन पनवेल) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बाणेर येथे चना लाईफ स्पेस बेलाकासा फेज तीन ही बांधकाम साईट सुरु आहे. या साईटवरून अज्ञात चोरट्याने आठ लाख 28 हजार रुपये किमतीच्या अल्युमिनियम शटरिंगच्या 80 प्लेट चोरून नेल्या. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.