Pune : मोदी यांना चाय-चाय तर, शाह यांना पकोडे विकावे लागणार – इम्तियाज जलील

एमआयएमचा प्रचाराचा नारळ फुटला

एमपीसी न्यूज – पब्लिक आपल्यावर आली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चाय…चाय…चाय… आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पकोडे विकावी लागणार, असल्याचा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला.

ऑल इंडिया मजलिस – ए- इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पुणे शहरातील पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील अधिकृत उमेदवार हिना शफीक मोमीन, हडपसर मतदारसंघातील उमेदवार जाहिद शेख, वडगावशेरी मतदारसंघातील उमेदवार डॅनियल लांडगे यांचा प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज (कोर्टर गेट) नाना पेठ येथे ही आज रात्री सभा झाली. खासदार इम्तियाज जलील, नगरसेविका सोनाली लांडगे यावेळी उपस्थित होते.

एमआयएमच्या तिन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्याचे आवाहन हिना मोमीन यांनी केले. राष्ट्रवादीचे भारत कांबळे यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला. एमआयएम हा जातीयवादी पक्ष नसल्याचे डॅनीयल लांडगे यांनी सांगितले.

इम्तियाज जलील म्हणाले, पुणे शहरात मी 12 वर्ष घालविले. तुमच्या मतदानाची गरज आहे. महाराष्ट्रात आम्ही 48 जागा लढवित आहोत. पुण्यात आम्हाला विशेष रुची आहे. महाराष्ट्रात आम्ही पाहिले नाव डॅनियल लांडगे यांचे जाहीर केले. पुण्यातून आम्ही जागा लढवतोय. बाजारात वाघांचे बच्चे विकले जात नाही. कुत्ते, बिल्ली आणि बैल विकले जातात. भाजप – शिवसेनेच्या सभांना पैसे देऊन गर्दी होते. ही जनता ओवेसी यांच्या प्रेमापोटी आली. हैद्राबादच्या शेरवानीचे महाराष्ट्रात काय काम म्हणून टीका केली जायची, तेव्हा मी त्यांना उत्तर दिले, तुम्हाला इटलीची कशी चालते? बंजारा, ख्रिश्चन, धोबी, मुस्लिम आशा सर्वच समाजातील लोकांना उमेदवारी दिली.

मागील विधानसभा निवडणुकीत शेतकरी, गरीब, हॉस्पिटलचे मुद्दे उठावले. लोकसभा निवडणुकीबाबत म्हणाले, शिवसेना – भाजपने 48 पैकी 42 जागा जिंकल्यानंतरही जल्लोष केला नाही. कारण औरंगाबादवरून मी विजयी झालो होतो. तर, पुण्यातही उमेदवार विजयी होऊ शकतात. हा देश मोदींजींच्या मर्जीवर नव्हे तर बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारा आहे.

लहान मुलाला फिट आल्याने इम्तियाज जलील यांचे काही वेळ भाषण थांबले. त्याला उपचार करण्यासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.