BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : इच्छाशक्ती मिळवाल तरच निश्चित ध्येयापर्यंत पोहोचाल –अजित रणसिंग

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – ध्येयासाठी जगणे, हे ध्येयासाठी मरण्यापेक्षा कठीण आहे. कार्यशक्ती आणि इच्छाशक्ती प्राप्त करा. खडतर परिश्रम करा. म्हणजे तुम्ही निश्‍चित ध्येयाप्रत पोचू शकाल, असे विचार रामक्रुष्ण मठाचे कार्यकर्ते अजित रणसिंग यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.

शनिवारी (दि. 16 )चिंचवड येथील क्रांतीवीर चापेकर माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय व क्रांतीवीर चापेकर विद्यामंदिर येथील सुसंवादात ते बोलत होते. यावेळी क्रांतिवीर चापेकर विद्या मंदिरचे शाळासमिती अध्यक्ष गतिराम भोईर, क्रांतिवीर चापेकर विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका वासंती तिकोणे ,क्रांतिवीर चापेकर माध्यमिक , उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ देविकर, दोन्ही विभागांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

  • ते पुढे म्हणाले की, दिवसभरातून एकदा तरी स्वत:शी संवाद साधा. तसे केले नाहीत तर तुम्ही या जगातील एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल.

विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतल्यामुळे कार्यक्रमात चैतन्य आले. विवेकानंद यांचे विचार सांगितले, व मुलांकडून वदवून घेतले. प्राणायमचे प्रात्यक्षिक ही करून घेतले. विद्यार्थ्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मुलांनी तात्काळ दिली. म्हणजे त्यांनी विद्यार्थ्यांचीही परीक्षा घेतली. उत्तरे दिलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तके बक्षिस रूपात दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश शिंदे यांनी केले. वर्षा जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

.

HB_POST_END_FTR-A1
.