Pune : मौजमजेसाठी वाहनांची चोरी केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलगा ताब्यात

एमपीसी न्यूज – मौजमजेसाठी वाहनांची चोरी केल्या प्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या गेल्या. ही कारवाई सोमवारी (दि.20) संध्याकाळी 6 च्या दरम्यान करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन चोरीस प्रतिबंध करण्यासाठी उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत फिरत असताना पोलिसांना मिळालेल्या बातमीनुसार एक अल्पवयीन मुलगा चोरी केलेली मोटारसायकल घेऊन शिवणे येथे येणार असल्याचे समजले.

_MPC_DIR_MPU_II

त्याप्रमाणे शिवणे येथे जाऊन त्या मुलास पकडून त्याची चौकशी केली असता त्याने ती पार्किंगमधून चोरल्याचे कबूल केले. त्याच्याकडून चोरीची मोटारसायकल हस्तगत करून त्याचबरोबर 30 हजार रुपये किमतीच्या आणखी 2 चोरी केलेल्या दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. चोरी करणारा मुलगा इयत्ता 10 वी मध्ये शिकत असून मौजमजेसाठी तो चोरी करत असल्याचे त्याने कबूल केले. तरी या अल्पवयीन बालकास त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले असून गुन्ह्याचा तपास अजूनही सुरू आहे.

ही कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 1 पुणे शहर, सहाय्यक पोलीस आयुक्त डेक्कन विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे, पोलीस निरीक्षक सतिश डहाळे, पोलीस उप निरीक्षक के.के. कांबळे, सहाय्यक पोलीस फौजदार वायदांडे, पोलीस हवालदार सूर्यवंशी, पोलीस नाईक पाटील, पोलीस शिपाई ढमढेरे, पोलीस शिपाई ताकवणे, पोलीस शिपाई त्रिंबके यांनी पार पडली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.