Bhosari : सोन्याचे गंठण हिसकावणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावणाऱ्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना भोसरी येथे घडली.

स्वरा शंकर माने (वय 30, रा. हनुमान कॉलनी, चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 14 वर्षीय बालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यास ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास फिर्यादी स्वरा या रस्त्याने पायी जात होत्या. त्या चक्रपाणी वसाहत येथील मुलानी पेट्रोल पंपाजवळील मोकळ्या जागेजवळ आल्या असता 14 वर्षीय अल्पवयीन मुलाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावले. मात्र त्यांनी आरडा ओरडा केल्याने नागरिकांनी अल्पवयीन मुलास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.