पालकमंत्री गिरीश बापट राजीनामा द्या, या मागणीसाठी स्वारगेट चौकात शिवसेनेचे आंदोलन

एमपीसी न्यूज पुणे – बीडमधील मुरंबी गावातील दोषी ठरलेल्या स्वस्त धान्य दुकानदारास परवाना बहाल केल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने गिरीश बापट यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गिरीश बापट यांनी राजीनामा द्यावा. या मागणीसाठी आज पुण्यातील स्वारगेट चौकात पुणे शहर शिवसेना पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

यावेळी शिवसेना गटनेते संजय भोसले,नगरसेवक विशाल धनवडे,माजी नगरसेवक शाम देशपांडे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शिवसेना गटनेते संजय भोसले म्हणाले की, बीड जिल्ह्यातील दोषी ठरलेल्या एका धान्य दुकानदारास परवाना बहाल केल्याप्रकरणी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कारभावर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. त्यांच्या अशा कारभारामुळे पुणे शहराचे नाव बदनाम झाले आहे. त्यामुळे गिरीश बापट यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. जर त्यांनी राजीनामा न दिल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन उभारले जाईल. असा इशारा देखील त्यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.