Talavade Crime News : अल्पवयीन मुलाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – एका अल्पवयीन मुलाने 15 वर्षीय मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. ही घटना मंगळवारी (दि. 18) दुपारी चार ते सहा वाजताच्या कालावधीत तळवडे येथे घडली.

याप्रकरणी पीडित 15 वर्षीय मुलीच्या आईने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 17 वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करत त्याला बाल सुधारगृहात पाठवले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 15 वर्षीय मुलीला अल्पवयीन मुलाने तळवडे येथील एका ठिकाणी झाडाझुडूपात नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शरीर संबंध केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.