Wakad : किरकोळ कारणावरून तरुणावर वार; एकाला अटक

एमपीसी न्यूज – हातावर चहा सांडल्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून एकाला बेदम मारहाण करत कोयत्याने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 1) दुपारी पावणेचारच्या सुमारास शिवार चौक, रहाटणी येथे घडली. यामध्ये वाकड पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

राधेशाम भवरे, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह धा-या घोलप व त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कौशल कैलास मौर्य (वय 18, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कौशल त्यांचा मित्र शिवम ठाकूर आणि अन्य दोन मित्रांसोबत शिवार चौकात नाष्टा करण्यासाठी गेले. त्यावेळी शिवम यांच्या हातावर चहा सांडला. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या कौशल यांना आरोपींनी मारहाण केली. राधेशाम याने कौशल यांच्या डोक्यावर, पायावर कोयत्याने वार केले. यामध्ये कौशल गंभीर जखमी झाले. तर आरोपीच्या अन्य साथीदारांनी गट्टू फेकून मारले. वाकड पोलिसांनी राधेशाम याला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like