Maval : प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचा लॉजवर खून

एमपीसी न्यूज – प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीचा तिच्या प्रियकराने ब्लेडने वार करून खून केला. ही घटना बुधवारी (दि. 4) दुपारी साडेतीनच्या सुमारास वडगाव येथील एका लॉज येथे उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव मावळ येथील एका लॉजवर बुधवारी सकाळी 11 वाजता एक जोडपे आले. ते जोडपे लॉज मधील रूम नंबर 303 येथे थांबले. अज्ञात कारणावरून प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीच्या गळ्यावर, हातावर आणि पोटावर ब्लेडने वार करून खून केला. मुलीचा खून केल्यानंतर आरोपी लॉज मधून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच वडगाव मावळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला असून आरोपीच्या शोधात पथके रवाना करण्यात आली आहेत. रात्री उशिरापर्यंत वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.