BNR-HDR-TOP-Mobile

Dehuroad : खुनाच्या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलगा ताब्यात; एकाला अटक

एमपीसी न्यूज – देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2018 मध्ये झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यासोबत आणखी एक अल्पयीन मुलगा ताब्यात घेतला असून एका आरोपीला अटक केली आहे.

प्रशांत गांधी गुस्सर (वय 24, रा. देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी फारूक मुल्ला आणि मयूर वाडकर यांना माहिती मिळाली की, देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार असेलेले तीन इसम देहूरोड येथील पारशी चाळीत येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी चाळीमध्ये सापळा लावला. तिघांना पोलिसांचा सुगावा लागताच ते पळून जाऊ लागले. पोलिसांनी शिताफीने त्यांचा पाठलाग करून पकडले. पकडलेल्या तिघांमध्ये एक गुन्हेगार असून दोघेजण अल्पवयीन मुले आहेत. या कारवाईमुळे देहूरोड पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यासह दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहआयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस कर्मचारी फारूक मुल्ला, मयूर वाडकर, धनराज किरनाळे, संदीप ठाकरे, स्वामीनाथ जाधव, धनंजय भोसले, राजकुमार ईघारे, दत्तात्रय बनसुडे, भरत माने, ज्ञानेश्वर गाडेकर, श्यामसुंदर गुट्टे, दयानंद खेडकर यांच्या पथकाने केली.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3