Pimpri News : अल्पसंख्यांक आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचा लाभ घ्यावा – इखलास सय्यद

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण संचालनालय मार्फत केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्याक विद्यार्थी आणि सर्व जाती धर्माच्या अपंग विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप जाहीर झाली आहे. मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन ,बौद्ध विदयार्थ्यांनी अल्पसंख्यांक स्कॉलरशिप आणि सर्व जाती धर्माच्या अपंग विद्यार्थ्यांनी दिव्यांग स्कॉलरशिपचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस इखलास सय्यद यांनी केले.

या साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर असून अल्पसंख्याक स्कॉलरशिप साठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा,पालकांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख पेक्षा अधिक नसावे, मागील परीक्षेत किमान 50% गुण असावेत, अल्पसंख्यांक समुदायाचे स्वयंघोषित घोषणापत्र जोडावे, या अटी असून इयत्ता 11 वी ते पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी अर्ज करू शकतात.

तसेच दिव्यांगजन (अपंग) स्कॉलरशिप साठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, वार्षिक उत्पन्न 8 लाख पेक्षा अधिक नसावे, अपंग प्रमाणपत्र 40 % व त्या पुढील असावे. यासाठी इयत्ता 11 वी ते पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी इखलास सय्यद 9552345429 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.