Mirabai Chanu : गंभीर दुखापतीमध्येही हार न मानता मीराबाई चानूने जिंकले रौप्य पदक

एमपीसी न्यूज : ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानूने 2022 च्या जागतिक वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कोलंबियाची टोकियो 2020 ची चॅम्पियन चीनची हौ झिहुआ हिला पराभूत करून रौप्य पदक जिंकले आहे. तर, चीनच्या वेटलिफ्टर जियांग हुइहुआने 206 किलो वजन उचलून या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मीराबाई चानूचे जागतिक चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. ते म्हणाले, कि वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल मीराबाई चानूचे अभिनंदन. भारताला पुन्हा अभिमान वाटला!”

Mirabai Chanu

Kaivalya Nagare : अवघ्या अडीज वर्षाच्या कैवल्याने केला ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’

कोलंबियातील बोगोटा येथे झालेल्या वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील मीराचा प्रवास सोपा नव्हता. ती दुखापतीशी झुंज देत होती. पण ती खचली नाही. तिने 113 किलो वजन उचलून क्लीन अँड जर्कमध्ये रौप्य पदक जिंकले. मात्र, स्नॅचच्या प्रयत्नात वजन उचलताना तिचा तोल गेल्याने तिने शानदार बचाव केला. मात्र, अशा परिस्थितीत शरीरावर ताबा ठेवताना तिच्या गुडघ्याला दुखापत झाली. मीराबाईने स्नॅचमध्ये 87 किलो वजन उचलले. अशा प्रकारे तिने एकूण 200 किलो वजन उचलले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.