Chakan : गावाला जाऊन येतो असे सांगून निघालेल्या मायलेकी बेपत्ता

एमपीसी न्यूज – गावाला जावून येते, असे सांगून राहत्या घरातून गेल्या पंधरा दिवसांपूर्वी चाकण येथून निघून गेलेल्या मायलेकी परत घरी आल्या नसून बेपत्ता झाल्या असल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिली. 

प्रिती राहुल ओव्हाळ (वय – २८ वर्षे) व त्यांची सहा वर्षांची कन्या राजलक्ष्मी राहुल ओव्हाळ (दोघीही रा. गोकुळ कॉम्प्लेक्स, कोहिनूर सेंटर, चाकण, ता. खेड), असे बेपत्ता झालेल्या मायलेकींची नावे आहेत. प्रिती ओव्हाळ यांचे पती राहुल बळीराम ओव्हाळ (वय – ३२ वर्षे, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

प्रिती ही तिची मुलगी राजलक्ष्मी हिला बरोबर घेऊन रविवारी ( दि. २ ) दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान गावाला जाऊन येते, असे सांगून राहत्या घरातून चाकण येथून निघून गेल्या आहेत. तेव्हापासून त्या दोघीही परत घरी आल्या नाहीत. त्यांचा सर्वत्र शोध घेऊनही काहीच थांगपत्ता लागला नसल्याने त्या बेपत्ता झाल्याची फिर्याद येथील पोलीस ठाण्यात देण्यात आली. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.