रविवार, सप्टेंबर 25, 2022

Deadbody Found: बेपत्ता मुलीचा गावाजवळच सापडला मृतदेह, मावळातील कोथुर्णे गावातील घटना

एमपीसी न्यूज: मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावातील सात वर्षीय मुलगी ही बेपत्ता होती. मात्र आज (बुधवारी) तिच्या गावाजवळच एका झुडपात तिचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Deadbody found) स्वरांजली जनार्दन चांदेकर (वय सात) असे मयत मुलीचे नाव आहे.

 

कोथुर्णे येथील स्वरांजली जनार्दन चांदेकर (वय सात) असे मयत मुलीचे नाव आहे. स्वरांजली ही इयत्ता दुसरीत शिक्षण घेत होती.(Deadbody Found) सध्या तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. स्वरांजली ही काल (मंगळवारी) तीनच्या सुमारास बेपत्ता झाली होती. त्यानंतर घरच्यांची धावाधाव सुरु झाली. शोध सुर असताना तिचा मृतदेह गावाजवळच एका झुडपात अढळून आला. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

 

 

 

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास भोसले, कामशेत पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार यांच्यासह पुणे ग्रामीणच्या पोलीस अधिकाऱ्यांनी कौशल्यपूर्वक तपास चक्र फिरवत रात्रभर शोध मोहीम राबवली. खडापाहारा देत संपूर्ण गावात ग्रामस्थांच्या मदतीने चौकशी केली. मात्र मुलीचा शोध लागला नाही.

 

Hinjawadi Murder Case : अनोळखी इसमाच्या खून प्रकरणी एकाला अटक

 

सकाळी पुन्हा ग्रामस्थांना विश्वासात घेत 10 जणांची 10 पथके तयार केली. त्यानंतर आता या प्रकरणात आज एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. (Deadbody Found) आज बुधवार (दि.3) रोजी सकाळी पावणे बाराच्या सुमारास गावातील जि. प. प्राथमिक शाळेच्या मागे निर्जनस्थळी गवतात या मुलीचा मृतदेह आढळला.त्यानंतर श्वान पथकाच्या साहाय्याने तपास सुरू केला. त्यानुसार संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून कसून चौकशी सुरु आहे. मात्र घटना नक्की काय  घडली याबाबत पोलीस थोड्याच वेळात अधिकृत माहिती देणार आहेत.

 

spot_img
Latest news
Related news