MIssing Girl Murder: कोथुर्णे प्रकरणी एकाला अटक, अवघ्या 24 तासात छडा लावण्यात पोलिसांना यश

एमपीसी न्यूज: मावळातील कोथूर्णे गावातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली.(Missing Girl Murder) यावेळी कामशेत पोलिसांनी तपासाची सुत्रे हलवत 24 तासाच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी मंगळवार (दि.2) कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

 

 

 

दि 02 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 वा.च्या सुमारास कामशेत पोलीस स्टेशन हददीत मौजे कोथुर्णे ता. मावळ जि. पुणे या गावात एका अल्पवयीन मुलीचे कोणीतरी तिच्या राहत्या घरासमोरुन अपहरण केले होते. या बाबत तिच्या वडीलांनी पोलीस स्टेशमध्ये येऊन माहिती दिली होती. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वडीलांच्या तक्रारीवरुन कामशेत पोलीस स्टेशन मध्ये भादवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन संपुर्ण गावात अपहरण झालेल्या मुलीचा शोध सुरु केला.

 

 

 

 

सदर ठिकाणी  श्री. अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मिलींद मोहीते, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, भाऊसाहेब ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी, हवेली विभाग अति कार्यभार लोणावळा विभाग यांनी गुन्हा घडले्ल्या ठिकाणी भेट देउन अपहरण झालेल्या मुलीचा संपूर्ण गावात शोध घेतला. (Missing Girl Murder) तपासाला गती देण्या करीता पोनि अशोक शेळके, स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा पुणे ग्रामीण, पोलीस निरीक्षक संजय जगताप, पोनि, विलास भोसले, वडगांव मावळ पोलीस स्टेशन, सहा. पोलीस निरीक्षक, आकाश पवार, सपोनि गंधारे, सपोनि बावकर, पोसई चौधरी, स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा, सपोनि माने, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन यांचे नेतृत्वात वेगवेगळी तपास पथके तयार केली.

 

Pcmc Election 2022 : महापालिकेची नगरसेवक संख्या 128 च राहणार; आता तीनचे नव्हे चार नगरसेवकांचे ‘पॅनेल’

 

 

तपास पथकामार्फत अपहरण झालेल्या मुलीचा शोध सुरु असताना कोथुर्णे गावातील जि. परिषद शाळेच्या पाठीमागील बाजुस अपहरण झालेली मुलगी ही संशईत रित्या मृत अवस्थेत अढळून आली. त्यामुळे गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन पोलीसांनी सदर गुन्हयाचा कसोशीने तपास करत याप्रकरणी एका संशयिताला अटक केले. या संशयित आरोपीची चोेकशी केली असता त्याने आपणच हा गुन्हा केला असल्याची कबूली दिली. (Missing Girl Murder) तेजस उर्फ दादा महीपती दळवी वय 24 वर्षे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून यास जेरबंद करण्यात कामशेत पोलीसांना यश आलेले आहे. या आरोपीवर पोस्को, 302 व 363 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेष म्हणजे अवघ्या चोवीस तासाच्या आत पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला आहे. सध्या तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

 

 

सदरची कामगिरी ही डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मिलींद मोहीते, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, भाऊसाहेब ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी, हवेली विभाग अति कार्यभार लोणावळा विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहा. पोलीस निरीक्षक,आकाश पवार,पोलीस उपनिरीक्षक, शुभम चव्हाण, सहा फौजदार, प्रकाश वाघमारे, शब्बीर पठाण, पो. हवा, हनुमंत पासलकर, प्रमोद नवले, पो. ना. समाधान नाईकनवरे पो. कॉ. प्राण यवले, स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा पुणे ग्रामीण व सहा फौजदार समीर शेख, पोलीस हवालदार, तावरे, दिक्षीत , बनसोडे  राय, पो. ना. हिप्परकर,  कळसाईत, आशिष झगडे , रविंद्र राऊळ ,होमगार्ड प्रशांत फटके, किसन बोंबले यांचे पथकाने केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठांचे सुचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय जगताप हे करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.