Lonavala : कुसगाव येथून दोन वर्षाच्या मुलासह महिला बेपत्ता

 

एमपीसी न्यूज : लोणावळ्या जवळील कुसगाव बुद्रुक गावात राहणारी एक 21 वर्षीय महिला तिच्या दोन वर्षीय मुलासह बेपत्ता झाली आहे. बुधवारी दुपारी ही घटना घडली आहे. 
स्वाती राजू झेंडारे (वय 21) व आदि राजू झेंडारे (वय 2 वर्ष) अशी बेपत्ता झालेल्या माय लेकांची नावे आहेत. राजू झेंडारे यांनी या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून ग्रामीणचे पोलीस नाईक डी. पी. चाकणे पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.