Mission Baramati : भाई भतीजा वाद अन् त्यातूनच भ्रष्टाचाराचा जन्म; बारामतीत निर्मला सीतारामन यांची पवारांवर टीका

एमपीसी न्यूज : 2024 साली काहीही करून बारामती लोकसभा (Mission Baramati) जिंकायचीच असा चंगच जणू भाजपने बांधलाय. त्यासाठी भाजपने मिशन बारामती सुरू केलं असून या अंतर्गत केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन बारामती दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी निर्मला सीतारामन यांनी बारामतीत जाऊन पवारांवर थेट टीका केली. परिवार वाद, भाई भतीजा वाद अन् त्यातूनच भ्रष्टाचाराचा जन्म होतो. असे म्हणत त्यांनी पवार कुटुंब यावर निशाणा साधला.

निर्मला सीतारामन म्हणाल्या, परिवार वाद आणि भाई-भतीजा वाद या त्रिसूत्रीचा बारामतीसाठी वापर केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शंभर पैकी शंभर मार्क मिळू शकते. बारामतीमध्ये हा भ्रष्टाचार कशासाठी सुरू आहे असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. भ्रष्टाचार केल्यामुळे कितीतरी राजकारणी तुरुंगात गेले यापुढेही जातील असेही त्या यावेळी म्हणाल्या. यावेळी त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना परिवार वाद, भतीजा वाद आणि भ्रष्टाचार ही त्रिसूत्री जनतेसमोर मांडून..वास्तव जनतेसमोर आणण्याचे आवाहन केले.

निर्मला सीतारामन म्हणाल्या, बारामतीत (Mission Baramati) भ्रष्टाचाराविरोधात काम करण्यासाठी भरपूर काही आहे. या भागात भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी मी दौरा करत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी कोणाच्याही दबावाला बळी पडू नये, ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे असे सांगत भ्रष्टाचार विरोधात लढण्याचे आवाहन केले.

Pune Accident : सहा महिन्याच्या चिमूरड्याचा अपघातात दुर्दैवी अंत; पुणे जिल्ह्यातील घटनेने हळहळ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.