MISSION BEGIN AGAIN : राज्यात प्रवासासाठी आता ई-पासची गरज नाही, नवी नियमावली जाहीर

ई-पासची अट रद्द केली आहे. यामळे आंतरराज्य प्रवास करण्यावरील बंधनं शिथील झाली आहेत.

एमपीसी न्यूज – राज्य सरकारने मिशन बिगीन अगेन अंतर्गत नवीन नियमावली जाहीर केली असून राज्यात 30 सप्टेंबरपर्यंत निर्बंध कायम राहणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र,  ई-पासची अट रद्द केली आहे. यामळे आंतरराज्य प्रवास करण्यावरील बंधनं शिथील झाली आहेत. यामुळे प्रवास करताना आता ई-पासची गरज नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

याशिवाय खासगी तसंच मिनी बसेसना परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल आणि लॉज यांनाही पूर्णपणे सुरु होण्यास परवानगी देण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

राज्य सरकारने शाळा, कॉलेज तसंच शैक्षणिक संस्था 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय चित्रपटगृह, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, बार, सभागृह यांच्यावरही बंधनं कायम आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like