Mission Begin Again: लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत पण मॉल्स सुरु होणार; दुचाकीवर दोघांना प्रवासाची मुभा

Mission Begin Again: Lockdown till August 31 but malls will start; two-wheeler with double seat are allowed जिल्हाबंदी उठवण्याबाबत सरकारने सध्या कोणताही निर्णय घेतलेला नाही. केंद्र सरकारने हा निर्णय राज्य सरकारवर सोपवला आहे.

एमपीसी न्यूज- ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत महाराष्ट्र सरकारने पुढच्या टप्प्यात आणखी काही निर्बंध शिथील करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता दुचाकीवर दोघांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याचबरोबर 5 ऑगस्टपासून सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. चार महिन्यांनतर मॉल उघडले जाणार आहेत. राज्यात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. येत्या 1 ऑगस्टपासून ‘मिशन बिगिन अगेन’चा पुढचा टप्पा सुरु होणार आहे.

राज्य सरकारने टॅक्सी व कॅबमध्ये चालक आणि 3 प्रवासी, रिक्षात चालक आणि 2 प्रवासी, चार चाकी वाहनात चालक अधिक तिघांना प्रवासाची सवलत दिली आहे. दुचाकीवर दोघांना प्रवास करण्यास परवानगी नसल्यामुळे अनेकवेळा पोलीस आणि वाहन चालकांमध्ये वादाचे प्रसंग घडत होते.

सरकारने दुचाकीवर दोघांना प्रवास करण्यास मुभा दिल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, या दोघांनीही हेल्मेट व मास्क घालणे बंधनकारक असणार आहे. सर्व प्रकारच्या प्रवासात मास्क सक्ती असेल.


दरम्यान, जिल्हाबंदी उठवण्याबाबत सरकारने सध्या कोणताही निर्णय घेतलेला नाही. केंद्र सरकारने हा निर्णय राज्य सरकारवर सोपवला आहे.

मॉलमधील थिएटर्स, फूड कोर्ट्स आणि रेस्तराँ उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. रेस्तराँ आणि फूड कोर्टचे किचन सुरू ठेवण्याची व होम डिलिव्हरीची मुभा देण्यात आली आहे.

संघाची गरज नसलेल्या खेळांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये गोल्फ, नेमबाजी, मल्लखांब, जिमनॅस्टिक, टेनिस, बॅडमिंटन या खेळांस 5 ऑगस्टपासून परवानगी देण्यात आली आहे. फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटेशन याचे पालन करण्याची अट त्यासाठी घालण्यात आली आहे. काही अटींवर जिम सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.