Water drinking mistakes : पाणी पिताना केल्या जाणाऱ्या चुका

mistakes made in drinking water

एमपीसी न्यूज – पाणी ही मानवाच्या अत्यावश्यक गरजांपैकी एक आहे. त्याशिवाय आपण जगू शकत नाही. आपले शरीर 60% पाण्याचे बनले आहे म्हणून आपल्याला शरीराला हायड्रेटेड ठेवणे आवश्यक आहे.

थकवा, सुस्तपणा, चक्कर येणे इ. शरीर डीहायड्रेट असण्याची लक्षणे आहेत. तसेच, योग्य रीतीने पाणी पिणे तितकेच महत्वाचे आहे. आपल्यातील बहुतेक जण पाणी पिताना सामान्य चुका करतात जे आपल्याला अडचणीत आणू शकते. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया 

1) उभे असताना पाणी पिणे

‘उभं राहून पाणी पिऊ नये’ असे आपल्याला आपल्या आईने नेहमीच सांगितले आहे. अस केल्याने आपल्या शरीराला उपयोगी पोषकद्रव्ये थेट आपल्या पोटात जातात. हे आपल्या ऑक्सिजनची पातळी आणि फुफ्फुस आणि हृदय देखील डॅमेज करू शकते.

2) गटागटा पाणी पिणे

घाईने​ मोठे घोट घेण्यामुळे मूत्रपिंड आणि मूत्राशयातील अशुद्धता खाली जमा ​होण्याचा धोका असतो म्हणून हळूहळू पाणी ​प्यावे असा सल्ला दिला जातो त्याचे विविध फायदे आहेत. हळू हळू पाणी घेत आणि लहान घोट घेण्यामुळे तुमची पचन क्रिया बळकट होण्यास आणि तुमची चयापचय सुधारण्यास मदत होते.

3)जेवणाच्या अगदी आधी किंवा नंतर पाणी पिणे

जेवण करण्यापूर्वी पाणी पिणे टाळावे कारण असे केल्याने तुमचे पोट भरेल आणि तुम्ही पुरेसे खाण्यास सक्षम होऊ शकणार नाही. हे आपल्याला योग्य पोषण मिळण्यापासून प्रतिबंधित करते आणि जेवणानंतरच पाणी पिणे आपल्या पचनात व्यत्यय आणू शकते आणि मळमळ आणि बद्धकोष्ठता देखील होऊ शकते.

4) जास्त पाणी पिणे 

बरेच लोक पुरेसे पाणी पित नाहीत, परंतु असे काही लोक आहेत जे जास्त प्रमाणात पाणी ​पितात. अतिरिक्त पाणी पिण्याचे कोणतेही आरोग्य फायदे नाहीत. खरं तर, अतिरिक्त पाणी पिण्यामुळे हायपोनाट्रेमिया (hyponatremia) होऊ शकतो, याला पाण्याचे नशा देखील म्हणतात. या स्थितीत, शरीरातील सोडियमची पातळी खूप कमी होऊ शकते ज्यामुळे मेंदूत सूज, कोमा याचा​ धोका ​​होऊ शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.