Alandi : एमआयटी बी. एड. कॉलेजमध्ये शिक्षक भरती मेळावा; 40 पेक्षा जास्त शिक्षकांची निवड

एमपीसी न्यूज – एमआयटी संत ज्ञानेश्वर बी. एड. कॉलेजमध्ये एमआयटी व्ही जी एस व बी. एड. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवारी (दि 23) सकाळी 11 ते 5 यावेळेत शिक्षक भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या 12 पेक्षा जास्त शालेय संस्था सहभागी झाल्या. 40 पेक्षा जास्त प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक पदांसाठी ही भरती प्रक्रिया “शिक्षक भरती मेळावा” यातून निवड करण्यात आली. 200 पेक्षा जास्त इच्छुक व पात्र डीएड. बीएड. व एमएड. उमेदवार मुलाखतीसाठी अर्जासोबत आवश्यक मूळ कागदपत्रे व झेरॉक्स प्रति सोबत ठेवून उपस्थित राहिले.

एम आय टी व्ही जी एस, वर्ल्ड पिस स्कूल, ईल्प्रो इंटरनॅशनल स्कूल, गॉडीयस स्कूल, गायञी स्कूल, किड्स पॅराडाईज स्कूल, श्री संत साई संस्थानचे स्कूल यांनी सहभाग घेतला होता, अशी माहिती संत ज्ञानेश्वर बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ व समन्वयक प्रा. संजय शिंदे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.