Pimpri: आमदार अण्णा बनसोडे यांनी घेतला मेट्रोच्या कामाचा आढावा; दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त 

MLA Anna Bansode reviews Metro work; Expressed displeasure over procrastination : आमदार अण्णा बनसोडे यांनी घेतला मेट्रोच्या कामाचा आढावा; दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट-पुणे या मार्गासाठी सुरु असलेल्या मेट्रो कामाची आमदार अण्णा बनसोडे यांनी पाहणी केली. मेट्रोच्या कामात कोरोना लॉकडाऊन नंतरच्या दिरंगाईबाबत त्यांनी संचालकांसमोर नाराजी व्यक्त केली. तसेच परराज्यातील स्थलांतरीत कामगारांमुळे कामगार कमी पडत असतील तर स्थानिक कामगारांना रोजगार द्यावा, अशा सूचना आमदार बनसोडे यांनी मेट्रोचे संचालक ब्रिजेश दीक्षित यांना केल्या.

मेट्रोच्या कामाची आमदार बनसोडे यांनी नुकतीच पाहाणी केली. मेट्रोचे काम कोरोना काळापूर्वी अत्यंत जलदगतीने होते.

परंतु, आता खुपच संथ गतीने काम सुरु आहे. असे झाल्यास मंजुरी मिळालेल्या पिंपरी ते निगडी या मेट्रोच्या विस्तारीकरणाचे काम लवकर कसे होणार ? त्यामुळे त्यांनी मेट्रोच्या संचालक व अन्य अधिकार्‍यांबरोबर बैठक घेतली. यावेळी संचालक दीक्षित, सहसंचालक रामनाथन सुब्रम्हण्यम, नियोजन अधिकारी संतोष पाटील उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

मेट्रोच्या संथ गतीच्या कामाबाबत आमदार बनसोडे यांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर मेट्रोच्या अधिकार्‍यांनी एकूण कामगारांपैकी 90 टक्के कामगारांनी कोरोनाचा प्रार्दुभाव वाढल्यानंतर स्थलांतर केले. त्यामुळे कामगारांच्या कमतरतेमुळे काम संथ गतीने होत आहे, असे सांगितले.

त्यावर बोलताना आमदार बनसोडे म्हणाले की, मेट्रोच्या कामासाठी कुशल व अकुशल कामगारांची आवश्यकता असल्यास स्थानिक कामगारांना रोजगार द्यावा. कामगार मिळत नसतील तर आम्ही कामगार पुरवू. परंतु, मेट्रोचे काम जलदगतीने करा.

मेट्राचे काम ठरलेल्या वेळेत लवकरात लवकर करण्यासाठी प्रयत्न करा. पिंपरी ते निगडी या वाढीव कामासाठी राज्य सरकारने सुमारे 1500 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like