Bachhu Kadu : आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षांची शिक्षा

एमपीसी न्यूज :  आमदार बच्चू कडू यांना नाशिक व जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. शासकीय कामात अडथळा आणि आणि  (Bachhu Kadu) अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक संदर्भात न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. दरम्यान 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर बच्चू कडू यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

Talegaon News : कारला ट्रक घासला म्हणून ट्रक चालकास लुटले

दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही या वादातून आमदार बच्चू कडू यांनी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तसेच शिवीगाळ केली होती. यावर पोलिसांनी हस्तक्षेप करत पुढील घटना थांबवली आणि कडू यांना ताब्यात घेतले होते. सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता.यानंतर आता न्यायालयाने शासकीय कामात अडथळा आणि आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक संदर्भात न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण –

नाशिक महापालिका आयुक्तांवर आमदार बच्चू कडू यांनी हात उगारला होता. यानंतर आमदार बच्चू कडू यांना सरकारी अधिकाऱ्याला मारहाण करणे चांगलेच भोवले आहे. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर नाशिक न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालायात सुनावणी सुरू होती. नाशिक आयुक्तांवर हात उगारल्या प्रकरणी बच्चू कडू यांना दोन वेगवेगळ्या प्रकारणात ही दोन वर्षाची शिक्षा झाली आहे.(Bachhu kadu) 2017 साली नाशिक महापालिकेत अपंगांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते. महापालिका आयुक्त यांना धमाकवणे आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांच्यावर होता.

तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे आता सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 1 तर सरकारी अधिकाऱ्याला अपमानित केल्याप्रकरणी 1 अशी 2 वर्षांची शिक्षा आमदार बच्चू कडूंना ठोठावण्यात आली आहे.

तर याआधीही तत्कालीन जलसंपदा आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चु कडू यांना 2014 मध्ये अचलपूरचे आमदार म्हणून निवडून आल्याच्या तक्रारीत दोषी ठरवले  होते.(Bachhu Kade) त्यांना न्यायालयाने दोन महिन्यांचा साधा कारावास आणि 25,000 रुपये दंड ठोठावला होता. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार न्यायालयाने हा निकाल दिला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.