MLA Bharat Bhalke Critical Condition : आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक, रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

एमपीसीन्यूज : पंढरपूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

आमदार भालके यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यावर उपचार घेऊन ते सुखरूप घरीही परतले होते. परंतु, त्यानंतर काही दिवसांनी इतर आजार बळावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

मागील तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती अतिशय खालावली आहे. शरीरही उपचाराला साथ देत नसल्यामुळे त्यांना ऑक्सिजन’वर ठेवण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.