Akurdi : आमदार चाबुकस्वार व लक्ष्मण जगताप यांच्या संयुक्त सभेने प्रचार शिगेला…!

एमपीसी न्यूज – बारामतीवरून कितीही फौजा आल्या तरी शिवसेनेचा हा अभेद्य गड कदापी हलणार नसून मावळमधून बारणे सर्वाधिक मतांनी विजयी होतील’, असा ठाम विश्वास आमदार लक्ष्मण जगताप व आमदार ॲड गौतम चाबुकस्वार यांनी आज आकुर्डी येथे झालेल्या विराट जाहीर सभेत व्यक्त केला.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ आकुर्डी येथे जाहीर सभा घेण्यात आली. खासदार अमर साबळे, नगरसेवक प्रमोद कुटे, सरिता साने,सदाशिव खाडे, कैलास कुटे,शहर प्रमुख योगेश बाबर, ॲड ऊर्मिला काळभोर, अमित गोरखे, झिशान सय्यद आदी यावेळी उपस्थित होते.

“मागील पाच वर्षात खासदार बारणे यांनी केलेली कामे पाहून व संसदेतील त्यांची लक्षणीय कामगिरीची नोंद घेऊन सलग पाच वर्ष संसदरत्न पुरस्कार मिळविण्याचा बहुमान बारणे यांनी प्राप्त केला आहे. त्यामुळे मावळची जनता बारणे यांनाच निवडून देत बारामतीचे हे पार्सल रिटर्न पाठवणार असल्याचे आमदार चाबुकस्वार यांनी यावेळी म्हटले. येथील विठ्ठल मंदिराजवळ झालेल्या या सभेला सुमारे पाच हजार नागरिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.