Pune : आमदार डॉ. नीलम गो-हे यांचा प्रवास उलगडणार पुस्तकरूपी 

एमपीसी न्यूज – सुप्रसिद्ध कवयित्री आणि स्त्रीवादी लेखिका अंजली कुलकर्णी यांनी लिहिलेले आमदार डॉ. नीलम गो-हे यांच्या सामाजिक कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारे पुस्तक विश्वकर्मा पब्लिकेशन्सतर्फे लवकरच प्रकाशित होणार आहे.

डॉ. नीलम गो-हे ह्या गेली ३५ वर्षे महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतीय राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत नीलम गोऱ्हे यांनी राजकारण आणि समाजकारण यांची सांगड घालत. शिवसेनेची वीस वर्षाची वाटचाल असो, की विधान परिषदेवरील सोळा वर्षांची आमदारकी असो; प्रवक्तेपणाची जबाबदारी असो, की संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदातील प्रतिनिधित्व असो, नीलम गोऱ्हे यांनी महिलांचे प्रश्न हाच आपल्या कामाचा केंद्रबिंदु मानला आहे. आणि आता हाच प्रवास वाचकांना पुस्तकरुपी वाचायला मिळणार आहे.

अर्जुनाला दिसणाच्या पक्ष्याच्या डोळ्याप्रमाणे नीलमताईंचा कामाचा फोकस नेहमीच स्त्रियांना सामाजिक न्याय, समता आणि त्यांचा राजकीय सहभाग यांवर राहिला. प्रबोधन, रचनात्मक कार्य आणि संघर्ष या त्रिसूत्रीवर त्यांच्या प्रचंड कामाचा डोलारा उभा राहिला. वैचारिक स्पष्टता, पक्की बैठक, प्रखर बुद्धिमत्ता, निर्भीडपणा, कामाचा झपाटा,संवेदनशीलता आणि कुठल्याही घटनेकडे पाहण्याचा लोकशाहीवादी, समतावादी, न्यायवादी दृष्टिकोन यांमुळे नीलमताईची स्वतंत्र आणि खास अशी मुद्रा सामाजिक क्षेत्रावर उमटली आहे. मात्र हा प्रवास प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता त्यामुळे या प्रवासाला पुस्तक रूप देऊन सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न असल्याचे लेखिका अंजली कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.