Pimpri : स्वातंत्र्य लढ्यामुळेच टिळक लोकमान्य झाले – गौतम चाबुकस्वार

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यलढ्यातील लोकमान्य टिळकांचे योगदान मोठे आहेच; मात्र त्यांनी जो लढा दिला तो सुराज्याचा. त्यांच्या लढ्यातूनच ख-या अर्थाने देश स्वातंत्र्याची प्रेरणा अवघ्या राष्ट्राला मिळाली आणि म्हणूनच ते लोकमान्य झाले, असे मत पिंपरीचे आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी केले. 

दै. केसरीच्या पिंपरी-चिंचवड विभागीय कार्यालयामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका आणि  केसरी मराठा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आज (बुधवारी) आयोजित करण्यात आलेल्या टिळक पुण्यतिथीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, ‘अ’ प्रभागाच्या अध्यक्षा अनुराधा गोरखे, ‘फ’च्या अध्यक्षा कमल घोलप, शिक्षण समितीच्या उपसभापती शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, काँग्रेस पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे, अशोक मंगलस, केसरीचे मुख्य वार्ताहर विजय भोसले, प्रकाश यादव, सुहास मातोंडकर आदी उपस्थित होते.

आमदार चाबुकस्वार म्हणाले, स्वातंत्र्यलढ्यातील टिळकांचे योगदान फार मोठे आहे. जहालमतवादी असलेल्या टिळकांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी फार मोठा संघर्ष करून स्वातंत्र्यलढ्याची मुहूर्तमेढ रोवली.  इंग्रजांविरूद्ध असंतोष निर्माण करण्यासाठी सर्व समाज एकत्र आला पाहिजे. त्यासाठी लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती, मेळे  सुरू  करून राष्ट्रप्रेम जागृत केले. आणि आजही लोकमान्यांच्या विचाराची समाजाला गरज असल्याचेही सांगून त्यांनी लोकमान्यांना आदरांजली वाहिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अण्णा बोदडे यांनी केले. विजय भोसले यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.