Pimple Nilkh : विरंगुळा केंद्राचे आमदार जगताप यांच्या हस्ते उद्‌घाटन 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 26 विशालनगर, पिंपळेनिलख येथील सावित्रीबाई फुले उद्यानाशेजारील विरंगुळा केंद्राचे भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ज्येष्ठ नागरिक संघ हा संपूर्ण महाराष्ट्रात आदर्शवत ज्येष्ठ नागरिक संघ व्हावा. शहराच्या विकासासाठी ज्येष्ठ नागरिक संघ सतत कार्यरत रहावा. यासाठी प्रयत्न करावेत, असे यावेळी बोलताना ते म्हणाले.

यावेळी स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, नगरसदस्या आरती चोंधे, नगरसदस्य संदीप कस्पटे, ज्येष्ठ नागरिक संघाचे सुधाकर वेदपाठक, अरुणभाऊ कस्पटे, सुर्यकांत मुथीयान, कार्यकारी अभियंता संजय कांबळे, बाबासाहेब गलबले आदी उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले, या बांधण्यात आलेल्या विरंगुळा केंद्रासाठी महापालिकेच्या माध्यमातून या पुढेही जास्तीत जास्त मदत करण्यात येईल. या विरंगुळा केंद्राचा लाभ प्रभागातील जेष्ठ नागरिकांना होणार आहे. हे  विरंगुळा केंद्र हे शहरातील महापालिकेच्या उद्यानातील पहिले विरंगुळा केंद्र आहे.

यावेळी नगरसदस्य संदीप कस्पटे यांनी ही आपले मनोगत व्य्क्त केले विरंगुळा केंद्रास 25  हजार मदत देत असल्याचे जाहीर केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये नगरसदस्या आरती चोंधे म्हणाल्या, या केंद्रामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे विविध प्रकारचे कार्यक्रम पार पाडण्यास मदत होईल. यावेळी त्यांनी विरंगुळा केंद्रास 25 खुर्च्या व 1 टेबल देण्यात येणार असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन व आभार माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like