Pune News: सिंहगड रस्त्याला पर्यायी मार्गाचे काम तातडीने पूर्ण करा – आमदार माधुरी मिसाळ

एमपीसी न्यूज : सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीला पर्यायी रस्ता ठरणाऱ्या कॅनालच्या कडेने पर्यायी मार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आमदार माधुरी मिसाळ यांनी केल्या.

आमदार मिसाळ आणि महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी आज या मार्गावर सुरू असलेल्या विकासकामांची पाहाणी केली.

नगरसेविका मंजुषा नागपुरे, अनिता कदम, पथ विभाग प्रमुख विजय कुलकर्णी, खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, सहायक अभियंता सुभाष शिंदे, अमर शिंदे, व्ही. एस. इंगवले उपस्थित होते.

मिसाळ म्हणाल्या, ‘सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुल ते फनटाइम थिएटर दरम्यानच्या प्रस्तावित उड्डाण पुलाचे काम लवकरच सुरू होत आहे. त्यापूर्वी पर्यायी रस्त्याची सर्व कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.’

मिसाळ पुढे म्हणाल्या, ‘वडगांव बुद्रक ते पु. ल. देशपांडे उद्यान दरम्यान साडेचार किलोमीटर लांबीचा आणि साडेसात मीटर रुंदीचा मार्ग विकसित करण्यात येत आहे. त्यापैकी तीन किलोमीटर नऊशे मीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. देशपांडे उद्यानामागील बेबी कॅनालवरील सहाशे मीटर लांबीच्या रस्त्याचे काम बाकी आहे. ते तातडीने हाती घेण्यात येत आहे. पर्यायी रस्त्याच्या बाजूने सीमाभिंत बांधणे, विद्युत वाहिन्या भूमिगत करणे, ट्रान्सफॉर्मर हलविणे, झाडांचे स्थलांतरण करणे, कलवडची दुरुस्ती आदी कामे करण्याच्या सूचना दिल्या.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.