Bhosari : केरळ पूरग्रस्तांना आमदार महेश लांडगे यांचा मदतीचा हात; दोन टन कांदा केला निर्यात 

एमपीसी न्यूज – अतिवृष्टीने केरळमध्ये हाहाकार माजला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. महापुराने उद्ध्वस्त झालेल्या केरळला देशभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी देखील केरळमधील बांधवांना मदतीचा हात दिला आहे. लांडगे यांनी केरळ पूरग्रस्तांसाठी दोन टन कांदा पाठविला आहे. तसेच केरळ पूरग्रस्त बांधवांना आप-आपल्या परीने सर्वांनी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये महापुराने हाहाकार माजवला होता. महापुराने अनेकांचा बळी घेतला असून  कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.  कुटुंबच्या-कुटुंब बेघर झाली आहेत. केरळमधील ही परिस्थिती अंगावर काटा आणणारी असून या पुरग्रस्तांना आता खरी गरज आहे ती मदतीची. देशभरातून केरळमधील पुरग्रस्तांना मदतीचा हात पुढे येत आहेत. सर्वजण आप-आपल्या परीने मदत करत आहेत. आरोग्य, जीवनावश्यक वस्तू पाठविल्या जात आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी मदतीचा हात दिला आहे. लांडगे यांनी दोन टन कांदा खरेदी करुन केरळ पूरग्रस्तांना पाठविण्यासाठी पिंपरीतील चर्च ऑफ गॉड यांच्याकडे सुपूर्त केला. या चर्चने देखील रात्रीच हा कांदा केरळकडे पाठविला आहे. केरळातील अलेप्पी, चेंगणूर, पतनमतीट्टा या जिल्ह्यातील नागरिकांना हा कांदा देण्यात येणार आहे.

आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘देवभूमी असलेल्या केरळच्या महापुराने अभूतपूर्व असे नुकसान झाले आहे. संपूर्ण राज्याचे जनजीवन विस्कळीत झाले असून केरळ राज्याला यातून बाहेर येण्यासाठी मदतीची गरज आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे जनजीवन सुरळित येण्यास सुरुवात झाली आहे. केरळ पूरग्रस्तांना मदतीची मोठी गरज आहे. राज्य सरकारने देखील त्यांना मदत केली आहे. तसेच पिंपरी महापालिकेतील नगरसेवकांनी देखील एक महिन्याचे मानधन देऊन मदत केली आहे. त्यामुळे माणुसकीच्या भावनेतून प्रत्येकाने आप-आपल्या परीने आपल्या केरळातील बांधवांना मदत करावी’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.