Bhosari News : ‘तुझको मिरची लगी तो मै क्या करू’ गाण्यावर आमदार महेश लांडगे थिरकले

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिका, सायकल मित्र, अविरत श्रमदान आणि महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली रिव्हर सायक्लोथॉन 2021 रविवारी (दि. 17) सकाळी पार पडली. शहरातील अनेक सायकल प्रेमींनी या सायक्लोथॉनमध्ये सहभाग नोंदवला. भोसरी येथील गाव जत्रा मैदान येथून सायक्लोथॉनची सुरुवात आणि शेवट झाला. त्यावेळी आमदार महेश लांडगे ‘तुझको मिरची लगी तो मै क्या करू’ या गाण्यावर थिरकले.

आमदार महेश लांडगे प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घेत असतात. तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणून त्यांची ओळख आहे. इंद्रायणी नदी संवर्धन आणि पर्यावरण रक्षण तसेच तरुणाईला व्यायामाचे, सायकल चालविण्याचे महत्व पटावे यासाठी या सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले होते. त्यात आमदार लांडगे यांनी तरुणाईचा उत्साह वाढविण्यासाठी एका गाण्यावर चक्क डान्स केला. आमदार लांडगे यांच्या चाहत्यांनी त्यांना यावर टाळ्या, शिट्ट्यांनी चांगलीच दाद दिली.

10 किमी आणि 25 किमी अशा दोन टप्प्यांमध्ये ही रॅली झाली. दहा किलोमीटरचा मार्ग लांडगे सभागृह – जय गणेश साम्राज्य संतनगर – इंद्रायणी स्वीट्स कॉर्नर एमआयडीसी एस ब्लॉक लांडगे सभागृह हा मार्ग होता. तर, 25 किलोमीटरचा मार्ग अंकुशराव लांडगे सभागृह – जय गणेश साम्राज्य – संतनगर – साने चौक – संतनगर – इंद्रायणी स्वीट्स कॉर्नर – एमआयडीसी एस ब्लॉक आणि लांडगे सभागृह असा होता. शहरातील अनेक सायकलस्वारांनी यात सहभाग नोंदवला.

सायक्लोथॉनमध्ये आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या डान्सची शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1