Chikhali News: निलेश नेवाळे यांना चांगल्या कामाची पावती मिळणार – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – चिखली येथील उद्योजक निलेश नेवाळे यांनी वडिलांच्या कार्याचा वारसा पुढे चालवत, सामाजिक कार्यात मोलाचे योगदान दिले आहे. विविध उपक्रमातून केलेले सामाजिक कार्य माझ्यापर्यंत पोहचते आहे. समाजाप्रती असलेले काम असेच ठेवा, त्या कामाची चांगली पावती आपल्याला मिळणार आहे, असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला. वाढदिवसानिमित्त आयोजित सामाजिक उपक्रमाच्या दरम्यान आमदार लांडगे बोलत होते.

यावेळी माजी महापौर राहूल जाधव, भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा उज्वला गावडे, भाजपा मिला मोर्चाच्या उपाध्यक्षा सरिता नेवाळे, सातारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश पवार, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विष्णूपंत नेवाळे, भाजपा शहर उपाध्यक्ष किसन बावकर, मंडलाध्यक्ष महादेव कवितके, युवानेते विनायक आबा मोरे, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र यादव, सामाजिक कार्यकर्ते विकास साने, मा. सरपंच तळवडे विठ्ठल भालेकर, टाळगाव ना पतसंस्था संस्थापक रोहिदास मोरे, अंकुश भांगरे, संदीप नेवाळे, अजय पाताडे, बाळासाहेब भागवत, सचिन सानप, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्यासह प्रभाग 11 मधील सर्व जेष्ठ नागरिक, कार्यकर्ते यांच्यासह मित्र परिवार उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘1997 ते 2017 पर्यंत समाविष्ट गावांसाठी झालेला खर्च आणि या पाच वर्षात केलेला खर्च आणि विकासकामे यामध्ये मोठी तफावत आहे. जे वीस वर्षात विकासकामे झाली नाहीत, ते पाच वर्षांत पूर्ण झाली. याच कामाची पावती आपल्याला मिळणार आहे.’

चिखलीकरांनी मला भरभरून दिले आहे. नागरिकांमध्ये मतपरिवर्तन झाले आहे. टीका करणाऱ्यांपेक्षा काम करणाऱ्यांना नागरिक संधी देतात. अनेकांना प्रभाग कसा, कितीचा, आरक्षण कसे पडेल, याची चिंता आहे. मात्र भाजपा हाच एकमेव पक्ष आहे जो 128 ठिकाणी उमेदवार देऊन पुन्हा सत्तेत येणार आहे. उमेदवारी देताना, चांगले काम, समाजाप्रती असलेले कार्य हे सुध्दा पाहिले जाणार आहे. त्यामुळे निलेश नेवाळे यांना त्यांच्या चांगल्या कामाची पावती निश्चित मिळणार आहे, असे लांडगे यांनी बोलताना सांगितले.

निलेश नेवाळे म्हणाले, वाढदिवसानिमित्त उपस्थित राहिलेल्या मान्यवरांमुळे आपल्याला वेगळी उर्जा मिळाली आहे. सामाजिक कार्यासोबतच आपण विकासाभिमुक कार्य घडेल यासाठी प्रयत्न करू, असा संकल्प यावेळी करतो.

वाढदिवसानिमित्त कोविडमुक्त परिसर होण्यासाठी सर्वाधिक जनजागृती करण्यात आली. यमुनानगर रूग्णालयातील डॉ. नेहा कामठे, डॉ. धनंजय यादव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. चिखलीतील स्वामी दयानंद एमफॉर छत्रालय येथे अन्नदान, चिखलीतील रागा होम्स, रागा आंगण, नेवाळे मळा परिसरातील गणपती मंदिर परिसरात उद्योजक कार्तिक लांडगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

वाढदिवासिनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास दात्यांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निलेश चौरे,करण यादगिरे यांनी शिबिर यशस्वीतेसाठी सहकार्य केले. सर्व कार्यक्रमाचे नियोजन गणेश तरूण मंडळ नेवाळेमळा आणि निलेश दादा नेवाळे युवा मंच यांच्या माध्यमातून कऱण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.