MLA Mahesh Landge : पैलवान ते आमदार होऊन आजपर्यंत वडीलांच्या आज्ञेत!

एमपीसी न्यूज – माझ्या आई-वडिलांनी केलेला संघर्ष आणि त्याग आमच्या कुटुंबियांच्या यशात महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या संस्कारामुळेच आम्हा भावंडांच्या जीवनाला दिशा मिळाली. मी पैलवान होण्यापासून ते आमदार होईपर्यंत आजपर्यंत वडीलांच्या आज्ञेत आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार राजकीय जीवनात कार्यरत आहे, अशा भावना भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) यांनी व्यक्त केल्या.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे  प्रेक्षागृह येथे जागतिक आनंदाच्या शाळेचे ‘संस्मृती प्रकाशन’च्या वतीने ‘दावडी ते रामधाम’ या  सैनिक रामभाऊ दगडु सातपुते यांच्या आत्मकथेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ‘श्रावणबाळ’ पुरस्काराने आमदार महेश लांडगे, बंधू सचिन आणि कार्तिक लांडगे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार लांडगे यांची वडील किसनराव लांडगे, आई हिराबाई लांडगे,  इंटरनॅशनल लाईफ कोच व प्रकाशक विनय सातपुते, ह.भ.प. दिगंबर ढोकले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

MLA Mahesh Landge

प्रकाशक विनय सातपुते म्हणाले की, ”संस्मृती प्रकाशनचे मुख्य उद्दिष्ट -मुलांनी आई-वडिलांवर एक चरित्र ग्रंथ लिहावा व पुस्तकरूपी श्रावणबाळ व्हावे, असे आमची भावना आहे. प्रत्येकाने आयुष्यात असे काहीतरी करावे, की आपल्या आत्मचरित्रावर एक एक सुपरहिट चित्रपट व प्रेरणादायी चित्रपट तयार करता येईल असे आवाहन करीत ही संकल्पना समाजात रुजावी या साठी संस्थेतर्फे ‘श्रावणबाळ’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.”

Dehuroad Crime News : कर्तव्यावर असलेल्या पोलिसाच्या लगावली कानशिलात

कामगार नेते सचिन लांडगे आणि उद्योजक कार्तिक लांडगे (MLA Mahesh Landge) यांनी सुद्धा आपले मनागत व्यक्त केले. ह.भ.प दिगंबर ढोकले यांनी ‘समाज व माता-पिता’ या विषयावर प्रबोधन केले. प्रा. माधवी पोफळे यांनी सूत्रसंलन केले. आनंदयात्री विनय सातपुतेंनी आभार मानले व राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रत्येक माणसाने आपल्या  आई-वडीलांचा आदर केला पाहिजे. समाजिक क्षेत्रात काम करीत असताना आजवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र, आई-वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा श्रावणबाळ पुरस्कार माझ्यासाठी आयुष्यभर स्मरणात राहणारा आहे. एखाद्या कार्यक्रमाला आई-वडील उपस्थित रहावेत आणि त्यांच्या मुलांचा असा सन्मान व्हावा, ही फार भाग्याची गोष्ट आहे, असे मनोगत व्यक्त करीत असताना आमदार लांडगे (MLA Mahesh Landge) भावूक झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.