Dighi : आमदार महेश लांडगे यांचा गाव भेट दौरा; दिघीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – भाजप-शिवसेना-रिपाई-रासप-शिवसंग्राम संघटना-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी दिघी परिसरात शनिवारी (दि. 5) गावभेट दौरा केला. या दौऱ्यामध्ये दिघी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला. जागोजागी आमदार महेश लांडगे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. आगामी निवडणुकीत महेश लांडगे यांना आज पुन्हा एकदा आमदार करण्याचा निर्धार नागरिकांनी केला.

दिघी गावठाण येथे आमदार महेश लांडगे यांचे पारंपारिक वाद्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. महिलांनी महेश लांडगे यांचे औक्षण केले. तसेच भव्य पुष्पहार अर्पण करून महेश लांडगे यांना दिघीकरांनी शुभेच्छा दिल्या. एकच वादा महेशदादा अशा घोषणा देत ठिकठिकाणी महेश लांडगे यांचे पुष्पवृष्टीने स्वागत केले. अनेक ठिकाणी कोपरा सभा पार पडल्या. या सभांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे यांनाच पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा निर्धार करण्यात आला.

ज्येष्ठ नागरिक, महिला, माजी सैनिक व तरुण मंडळांनी  गावभेट दौऱ्यात सहभाग घेतला. मागील 40 वर्षांपासून दिघेकर निवडणुकीला सामोरे जात आहेत, अनेक वर्ष मत देऊन चूक व्हायची, पण 2014 पासून मतदान केल्याचा अभिमान वाटतो, अशा भावना दिघीकर नागरिकांनी व्यक्त केल्या. सर्वसामान्यातला माणूस म्हणून ओळख असलेल्या आमदार महेश लांडगे यांनाच येत्या निवडणुकीत मत देणार असल्याचे हे नागरिकांनी सांगितले.

भाजप माजी सैनिक विकास आघाडी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष प्रल्हाद जगताप यांनी शहरातील सर्व माजी सैनिकांचा आमदार महेश लांडगे यांना पाठिंबा असल्याचे सांगितले. तसेच नागराज पिल्ले यांनी महेश लांडगे यांच्या कामाची पद्धत वेगळी असल्याचे काही उदाहरणे देत स्पष्ट केले. गावभेट दौऱ्यात आमदार महेश लांडगे यांनी दिघी परिसरातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या घरी तसेच प्रमुख सोसायट्यांमध्ये भेटी दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.