Bhosari News: आमदार महेशदादांचा वाढदिवस ‘कोरोना योद्धयांना’ समर्पित

कार्यकर्ते- समर्थकांकडून विविध सामाजिक उपक्रमांना प्राधान्य

एमपीसी न्यूज – कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी यावर्षीचा वाढदिवस ‘कोरोना योद्धयांना’ समर्पित केला. पुणे जिल्ह्यातील ‘सेलिब्रेटी आमदार’अशी ओळख असलेल्या लांडगे यांनी आपले समर्थक- कार्यकर्ते यांना वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करा, अशी साद घातली. त्याला समर्थकांनी तितक्याच प्रमाणिकपणे प्रतिसाद दिलेला दिसत आहे.

पिंपरी-चिंचवडमधील राजकीय पटलावरील ‘इव्हेंट’बाज पैलवान म्हणून आमदार महेश लांडगे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.

मात्र, यावर्षी कोरोनारुपी संकटाने संपूर्ण जगभारात थैमान घातले. या परिस्थितील गेल्या आठ महिन्यांपासून आमदार लांडगे आणि समर्थक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना मदत करण्यासाठी झटत आहेत.

मास्क फॉर सेफ पीसीएमसी मोहीम, कम्युनिटी किचन, कोरोना जनजागृती, प्लाझ्मा डोनेशन, स्वयंस्फूर्तीने लॉकडाउन, रक्तदान शिबीर, कोविड केअर सेंटर, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संवाद यासह अनेक उपक्रम आमदार लांडगे यांनी हाती घेतले. त्या उपक्रमांमध्ये समर्थक- कार्यकर्तेही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत.

दरम्यान, उद्या 27 नोव्हेंबर रोजी होणारा वाढदिवस आणि अभिष्टचिंतन सोहळा म्हणून लांडगे समर्थकांसाठी आनंदोत्सव असतो. प्रतिवर्षी भोसरीतील गावजत्रा मैदानावर हजारो चाहत्यांची गर्दी होते. भव्य-दिव्य कार्यक्रमांत आमदार लांडगे चाहत्यांचे अभिवादन स्वीकारतात.

विशेष म्हणजे, भोसरीसह संपूर्ण पिंपरी-चिंचवडमध्ये जाहिरात फलक, शुभेच्छांची होर्डिंग्सच्या भिंती उभारल्या जातात. 26 नोव्हेंबरच्या सायंकाळीपासून केक कापण्याचा कार्यक्रम सुरु होतो. दुसऱ्यादिवशी रात्री उशीरापर्यंत केक कापणे आणि आयोजित कार्यक्रमांना हजेरी लावणे अशी जोरदार रेलचेल सुरू असते.

सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस होणार साजरा

यावर्षी आमदार लांडगे यांनी कार्यकर्ते-समर्थकांना वाढदिवस साधेपणाने आणि कसलाही उत्सव साजरा न करता झाला पाहिजे, असे आवाहन केले. कोरोना योद्धांना समर्पिंत केलेला वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा व्हावा, अशी साद घालताच समर्थकांनी नियोजन सुरू केले.

रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर, प्लाझ्मादान शिबीर, कोरोना योद्धांचा सन्मान, गरजू नागरिकांना मदत, अनाथाश्रमामध्ये मदत असे विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले. त्यामुळे भोसरीसह पिंपरी-चिंचवडमधील लांडगे समर्थक- हितचिंतकांनी लांडगे यांनी घातलेल्या ‘साद’ ला प्रामाणिक प्रतिसाद दिला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.