शनिवार, ऑगस्ट 20, 2022

Chikhali News : आमदार रोहित पवारांकडून दत्ताकाकांच्या आठवणींना उजाळा

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी ( दि. 31 ) चिखली येथील राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते स्व. दत्ताकाका साने यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी स्व. दत्ताकाकांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केले तसेच साने कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली.

आमदार रोहित पवार हे गुरुवारी एका कार्यक्रमानिमित्त चिखली-साने चौक येथे आले होते. या कार्यक्रमात त्यांची स्व. साने यांचे चिरंजीव व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष यश साने यांची भेट झाली. यानंतर त्यांनी साने यांच्या निवासस्थानी भेट देत साने कुटुंबियांसोबत संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून स्व. दत्ताकाका साने यांनी केलेल्या कार्याचा त्यांची आवर्जून उल्लेख केला. तसेच त्यांचा आठवणींना उजाळा दिला. दरम्यान, यश साने यांच्या हस्ते आमदार पवार यांचा सन्मान करण्यात आला.

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेससाठी स्व. दत्ताकाका यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. त्यामुळे आम्ही साने कुटुंबीयांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार आहोत. कोणतीही मदत लागल्यास नि:संकोचपणे सांगा. साने कुटुंबासाठी आणि यश साने यांच्यासठी लागेल ती मदत करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार पवार यांनी दिली. यावेळी स्व. दत्ताकाका साने प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्त उपस्थित होते.

spot_img
Latest news
Related news